सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची पाचवी यादी प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला या यादीमुळे गती मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया, ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडी यांसंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ५२६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांनी दिली..