सातारा : माणदेशातील जैवविविधतेचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण आणि नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाच्या उद्देशाने माणदेश कन्झर्व्हेशन प्रोजेक्टच्या पथकाने कुकुडवाड परि. या मोहिमेदरम्यान युरोपियन नीलपंख या स्थलांतरित पक्ष्यांचे सुमारे ८ ते १० पक्षी निरीक्षणात आले. .यासोबतच, जागतिक स्तरावर अर्थात संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत असलेल्या स्टेप ईगल नेपाळी गरुड या शिकारी पक्ष्याचेही रंजक दर्शन घडले. त्याचे फोटो अर्णव गंधे यांनी टिपले. या नोंदींमुळे कुकुडवाड परिसराचे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे.