प्रवीण माळी तासवडे टोलनाका : शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड तालुक्यातील खोडशी ते वनवासमाची दरम्यान रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सिमेंटच्या महामार्गावर. मोठ्या खड्ड्यामुळे या ठिकाणी रोजच अपघातांची मालिका सुरू असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्ग प्राधिकरण विभागाने व ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्गाच्या नियमावलीलाच हरताळ फासण्याचे काम केले आहे.यामुळे वाहनचालक व स्थानिक महामार्गप्राधिकरण व ठेकेदाराचे नावाने बोंबाबोंब करत आहेत..2022 पासून शेंद्रे ते कागल या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.