दिघंची : दुष्काळामुळे आटपाडी तालुक्यात शेतीची कामे ठप्प झाली असून, शेतमजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. उदरनिर्वाहासाठी शेकडो मजुरांनी ऊसतोडणीसाठी परजिल्. उदरनिर्वाहासाठी शेकडो मजुरांनी ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यांची वाट धरली आहे. महिला, मुले आणि जनावरांसह बिऱ्हाडे गावाबाहेर पडू लागल्याने अनेक गावांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. दुसरीकडे, शेतीच्या कामांसाठी स्थानिक शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळामुळे रोजगाराचा अभाव आणि मजुरांची टंचाई, अशा दुहेरी संकटाचा सामना तालुक्याला करावा लागत आहे..