सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा कामांसाठी प्रस्तावित ५९२ कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर करारातील काही अटींवरू. ठेकेदाराला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स दिलेले असून, ठेकेदाराने डिपॉझिट आणि अन्य आवश्यक रक्कमही भरली आहे. मात्र, शासनाच्या 'मित्रा' या एजन्सीने तयार केलेल्या ॲग्रीमेंटमधील तीन-चार अटींवरून अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे ठेकेदाराने करारपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. परिणामी वर्क ऑर्डर जारी करण्याची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही..