बेळगाव : विधिमंडळाचे १० दिवसांचे हिवाळी अधिवेशन बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये ७ डिसेंबरपासून आयोजित करण्याचा प्राथमिक निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते. मात्र, अ. मात्र, अधिवेशनाची नेमकी तारीख, कालावधी आणि अधिकृत वेळापत्रकाबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल..गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व विभागांची बैठक घेऊन अधिवेशनाची तयारी करण्याची सूचना केली होती. आता सरकारने डिसेंबर महिन्यात अधिवेशन घेण्याचे निश्चित केल्याचे समजते.