मोहोळ : मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागून अंदाजे १५ ते १६ एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत तब्बल १३ शेतकऱ. या घटनेत तब्बल १३ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कष्टाने जोपासलेले पीक काढणीच्या तोंडावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे..आष्टे परिसरातील शेतांमध्ये ऊसाची लागवड केली होती.