सुरक्षेच्या कारणास्तव नांदेड विभागातील 4 महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी धावणारी काकीनाडा ते साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिसा, आंध्र प्रदेश राज्यात तर रेड अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, याच चक्रीवादळाची दाहकता लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील चार महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.