आर्य चाणक्य म्हणतात एकवेळी मारहाणीमुळे निर्माण झालेली जखम लवकर भरून निघते, मात्र आपल्या शब्दांमुळे एखादा व्यक्ती कधी दुखावला तर ती जखम कधीही भरून निघत नाही, त्यामुळे शब्द हे नेहमी जपून वापरले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे. आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला.