बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री शुभी शर्मा हिने मनोरंजन विश्वातील अनुभवांबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने नेमकं काय म्हटलं आहे? अनुपमा' आणि 'प्रतिज्ञा 2' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या ट्रान्सजेंडर अभिनेत्री शुभी शर्मा हिनं टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 'टर्निंग टेल्स' पॉडकास्टमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. 'बिग बॉस'शी संबंधित क्रिएटिव्ह टीममधील एका तरुणानं काम मिळवण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शुभीनं केला.