Cyclone Arnab News: अर्नब चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. उत्तर, पूर्व आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग आणि पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्नब चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत आंध्र प्रदेशातील बापटला आणि विशाखापट्टणम दरम्यान असलेल्या यानमजवळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात वादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमीपर्यंत पोहोचू शकतो.