Sanjay Raut: 10 झाड म्हणजे एक कसाब आहे. आम्ही झाडं आणि कसाब यांना एकात तागडीत तोलतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. आज (मंगळवारी, ता २७) माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 33,000 झाडं या पहिल्या टप्प्यात ते तोडणार आहेत. 33,000 झाडं तोडणं म्हणजे संपूर्ण जंगल नष्ट करणं. तिथून भीमाशंकर वाईल्ड लाईफ हे 20 किलोमीटरवरती आहे. त्यानंतर हे जे जंगल आहे साई जंगल, या जंगलामध्ये आदिवासी राहतात.