सातारा : पावसाने ओढ दिल्याने शेती संकटात सापडली असून, पिके उन्हाने जळू लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असतानाही, ग्रामीण भागातील काही फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे..पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील शेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.