मिरज : सांगली जिल्ह्यातील ऊसदर आंदोलन रविवार, दि. २५ ऑक्टोबरला मध्यरात्री आणखी पेटले. साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला. उसाने भर. उसाने भरलेल्या दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर जळून खाक झाला. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे ही घटना घडली..स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटविल्याचा आरोप आहे. यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलींचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..