सांगली : महापालिका क्षेत्रात मंगळवारी वीजपुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद राहणार आहे. वीज कंपनी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित करत अस. वीज कंपनी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित करत असल्याने याचा थेट फटका महापालिकेच्या पाणीपुरवठ्याला बसत आहे..वीज कंपनी आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. सध्या २५ टक्क्यांहून अधिक पाणीकपात आणि ३५ टक्क्यांहून अधिक पाणीगळती असे चित्र आहे.