सोलापूर : मध्यवर्ती बसस्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे किंवा अन्य कोणतीच सुविधा नाही. यामुळे या प्रवाशांना जमिनीवर किंवा कट्ट्यावर बसून. यामुळे या प्रवाशांना जमिनीवर किंवा कट्ट्यावर बसून बसची वाट पहावी लागते. .येथे अनेक कर्मचारी आपली दुचाकी पार्क करत असल्याने प्रवाशांना थांबायला जागा मिळत नाही. पुरुष कट्ट्यावर व पार्क केलेल्या दुचाकींच्या सीटवर बसतात; पण महिलांची मात्र मोठी पंचाईत होते. ही गैरसोय दूर करून बाकड्यांसह चांगले शेड निर्माण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.