हुपरी : कौटुंबिक कारणातून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून देवाला तेल घालण्यासाठी जात असलेल्या पट्टणकडोलीच्या ८० वर्षीय वृद्धाच्या अंगावर चारचाकी गा. साताप्पा कल्लू कांबळे (वय ८०, रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकडोली) असे या वृद्धाचे नाव आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी तक्षक दिलीप लोकरे (रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकडोली) याच्याविरोधात हुपरी पोलिसांत रविवारी (दि. २५) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे..