कोल्हापूर : नवी दिल्ली येथे केंद्र सरकारतर्फे आयोजित केलेल्या ब्रिक्स महोत्सवात कोल्हापुरी चप्पलचा डंका पाहायला मिळत आहे. महोत्सवात महाराष्ट्रातून कोल्. महोत्सवात महाराष्ट्रातून कोल्हापुरी चप्पलचा एकमेव स्टॉल आहे. कोल्हापूरच्या बाजीराव सातपुते यांना ही संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय अधिवेशनात सहभागी १९ देशांचे प्रतिनिधी या महोत्सवाला भेट देणार आहेत. त्यामुळे या देशांमध्ये कोल्हापूर चप्पलच्या माध्यमातून कोल्हापूरची ओळख पोहोचणार आहे. .नवी दिल्ली येथे २६ आणि २७ ऑक्टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय संसदीय संमेलन होत आहे.