कोल्हापूर : संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारलेल्या राजारामपुरी येथील गुन्हेगार नीलेश ऊर्फ महादेव दिलीप काळे (वय ४१, रा. यादवनग. यादवनगर, भीमानंद महाराज मठाजवळ, कोल्हापूर) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी मुसक्या आवळल्या. .संशयिताकडून गावठी बनावटीची दोन पिस्तूल, चार काडतुसे हस्तगत करण्यात आली. उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. शस्त्र तस्करीत मध्य प्रदेश कनेक्शन उघडकीस आले आहे. गुन्हेगाराच्या एका स्थानिक साथीदाराचेही नाव निष्पन्न झाले आहे.