लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापत असून, टोरेंट वीज प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून आता राजकीय आरोप ... भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोडू नये, ही भूमिका घेतली आहे. सरकारमधील शिंदेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, आवश्यकता नसताना वृक्षतोड करू नये, अशी राज्याच्या वनविभागाची भूमिका असते. केंद्र सरकारच्याही पर्यावरण विभागाची भूमिका याच पद्धतीची असते.