दत्ता कुंभार यांनी फायनान्सच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. शासनाने कुटुंबाला आधार देत कर्जमाफी करावी, अशी विनंती त्यांनी केली. लातूर) : खासगी फायनान्सच्या कर्जास कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंकुलगा राणी येथे सोमवारी घडली. दत्ता सूर्यकांत कुंभार असे या युवकाचे नाव आहे. याच कर्जाच्या विवंचनेला आणि त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.