रत्नागिरी : कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून धुळे रेल्वेस्थानकाचा ‘ओरिजिनेटिंग–टर्मिनेटिंग कोचिंग टर्मिनल’ म्हणून विकास करण्याच्या प्रस्तावाची तांत्रिक, परिचालनात्मक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याची मागणी केली आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासास अधिक मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे..