देवगड : मिठमुंबरी बागवाडी येथे ‘कायगो कायाकिंग’ या जलक्रीडा व्यवसायाचा शुभारंभ करण्यास विरोध करून अटकाव केल्याप्रकरणी देवगड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा. बेकायदेशीर जमाव जमवून व्यवसाय सुरू करण्यास अडथळा आणल्याचा, तसेच आंदोलन करण्याची, जलसमाधी घेण्याची आणि संबंधित ठिकाणी व्यवसाय सुरू न करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी देवगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे..