आमदार आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही भीमाशंकरमधील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. धाराशिव : रायगडच्या कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवर (Trees) आज ठाकरेंच्या सेनेकडून मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक या जंगलात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.