पान चार ॲंकर ---------- 13370 सप्तशृंग गड : आदिमायेचे कोजागिरी पौर्णिमे निमित्त मंदीर गाभाऱ्यात करण्यात आलेल्या फुलमाळांच्या आकर्षक सजावटीतील आश्वासक तेजोमय रुप. १४०० लिटर तीर्थजलाने भगवतीचा महाभिषेक; सुवर्णालंकारांनी देवीचे रूप सजले सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २६ : ‘सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’ या मंत्रघोषाने दुमदुमलेला सप्तशृंग गड, मुखातून अखंड उमटणारा ‘अंबे माता की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’चा जयघोष, कावडधारकांच्या श्रद्धेने भारावलेले वातावरण आणि आदिमाया सप्तशृंगी भगवतीच्या.