Farmers Distress : वर्धा जिल्ह्यात पावसाचा खंड आणि वाढत्या उन्हामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. अनेक शेतांमध्ये कापसाला सरासरी चारच बोंडे लागली आहेत. झाडांवर. झाडांवर हिरवा पाला दिसत असला, तरी अपेक्षित उत्पादनाची आशा मावळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत..सप्टेंबरपर्यंत किरकोळ पावसाच्या भरवशावर तग धरलेल्या कापूस पिकाला ऑक्टोबरमधील पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला. उष्णतेमुळे फुलांची गळ झाली असून, बोंडधारणाही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.