जळगाव लाईव्ह न्यूज । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून या वादळाचा सर्वाधिक परिणाम. गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा तसेच जोरदार वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात या वादळाचा थेट किती परिणाम होईल, याबाबत सध्या तरी अधिकृत हवामान अंदाज नाहीय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्यता आहे.