ॲंकर बागलाणला २ हजार शेतकऱ्यांची मदत रखडली --------------------------------------- ई केवायसी नसल्याने गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा सटाणा ता.२६ : बागलाण तालुक्यात मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या जवळपास दोन हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया रखडली आहे. तर, ई-केवायसी पूर्ण केलेल्या एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे बँक खात्याशी सीडिंग नसल्याने मदतीची रक्कम जमा होण्यात अडचणी येत आहेत.