आज 24 सप्टेंबर सत्यशोधक समाज स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1873 साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या दिनानिमित्त ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. एखाद्या जोडप्यानं 'सत्याशोधक' पद्धतीनं लग्न केल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, हे 'सत्यशोधक' म्हणजे नेमकं काय आहे. तरीही या 'सत्यशोधक' शब्दाचा संबंध महात्मा जोतिराव फुले यांच्याशी संबंधित असल्याचं अनेकांना माहीतही असतं. मात्र, फुल्यांचा सत्यशोधक समाज नेमका होता काय, त्यांना त्यातून काय अपेक्षित होतं?