‘कॉफी विथ करण’मधील वक्तव्यांवरून सुरू झालेलं ट्रोलिंग आणि विजयची उपरोधिक प्रतिक्रिया यामुळे हे जोडपं पुन्हा चर्चेत आलं आहे. काही जण विजयच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत, तर काहींना त्याच्या वक्तव्यांबद्दल अद्याप आक्षेप आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच हे जोडपं करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 9’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये सहभागी झालं होतं. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या प्रेमकहाणीपासून लग्नापर्यंतचा प्रवास उलगडला.