Ramayana : अभिनेता रणबीर कपूर लौकरच 'रामायण' चित्रपटात श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच दरम्यान तो 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. Ramayana: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुचर्चित, मोस्ट अवेटेड ‘रामायण’ या फिल्ममुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो सातत्याने या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकताच रणबीर हा फिल्मच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपति’ या क्विझ शोमध्ये पोहोचला होता.