Todays Gold Rate: सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. पण मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होताना दिसतो. आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथा पालथा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.