गणपतीपुळे : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी रविवारी गणपतीपुळे येथे भेट देत स्वयंभू श्रीगणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरात विधिवत पूजाअर्चा करून त्यांनी श्रींचे. मंदिरात विधिवत पूजाअर्चा करून त्यांनी श्रींचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आगमनामुळे गणपतीपुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते..गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर आणि अमित घनवटकर यांनी सचिन तेंडुलकर यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि तीर्थक्षेत्राची वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली.