रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी निराशा केल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्या. जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे पावसाअभावी, वाढत्या तापमानामुळे काजळी, जगबुडी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी घटत चालली असून आतापर्यंत ८ टक्क्यांनी पपाणी पातळी घटली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ८३ टक्के असलेला पाणीसाठा, यंदा ७५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. अशीच परिस्थती असल्यास उन्हाळ्यात पाण्याची भीषण परिस्थिती होण्याची शक्यता आहे.