नगर: सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वाढत्या खंडामुळे भूजलपातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १९४ गावे आणि १ हजार १२६ वाड्यांतील विहिरी कोरड्याठाक पडल्या. त्यामुळे चार लाख जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यात २१८ टँकर सुरू आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार असून टँकरची संख्याही वाढणार आहे. .Bhanudas Kotkar: ज्येष्ठ काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांचे निधन.