कोल्हापूर : नवरात्रौत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह विविध देणग्यांमुळे देवस्थान. .११ ते २० ऑक्टोबर या १० दिवसांत भाविकांनी २० लाख ३० हजार २२३ रुपयांचे सोने आणि ४४ लाख ३८ हजार ४६७ रुपयांची चांदी अर्पण केली. याशिवाय रोख देणगी, अगरबत्ती, लाडू, कॅलेंडर आणि साडी विक्रीतूनही देवस्थानला लाखांच्या घरात उत्पन्न मिळालेे. दानपेट्यांतील रकमेची मोजणी अद्याप बाकी असल्याने अंतिम उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे..