चंद्रपूर : ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात उघडकीस आला आहे. ऑनलाइन. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या महागड्या मोबाईलऐवजी पार्सलमध्ये कपडे धुण्याचे चार साबण आढळल्याने ग्राहकाला धक्का बसला. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने वरोरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..