सणांच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झालेत. गेल्या आठवड्यात फक्त चार दिवसात चांदीच्या दरात घसरण झाली आणि 16000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली आहे. वायदेबाजारात चांदीचा दर उच्चांकाच्या तुलनेत 2.24 लाख रुपयांनी कमी झाला आहे.